ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे संताजी युवक मित्रमंडळाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. माजी सरपंच नामदेव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उपसरपंच शेखर कर्डिले, कैलास व्यवहारे, अरुण केदार, ए. टी. शिंदे, राहुल केदार आदीसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपसरपंच शेखर कर्डिले यांनी संताजी जगनाडे महाराज यांच्याबद्दल माहिती सांगितली. यावेळी अरुण कर्डिले, विलास वाघ, मनोज वालझाडे, सौरभ कर्डिले, दादू केदार, अरुण शिंदे यांच्यासह परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संताजी मित्रमंडळाच्या सदस्यांनी प्रयत्न केले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade