फुलसावंगी तेली समाज - फुलसावंगी येथील समाज बांधवाच्यावतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल व प्रमुख पाहुणे म्हणून अशोक कारमोरे, प्रकाश वानखेडे उपस्थित होते. यावेळी संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल यांनी संताजी महाराज यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल सोनुने जिल्हा संघटक तेली समाज संघटन यांनी केले. संचालन केशव सोनुने यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष अर्जुन सोनुने, संदीप साखरे, शिवलिंग रणखांब, पंडित सोळंके, मनोज रणखांब, अर्जुन ग. सोनुने यांनी परिश्रम घेतले तर अभार मोहन सोनुने यांनी मानले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade