संताजी महाराज जगनाडे यांची जयंती राजगुरुनगरमधील तेली समाजाच्या वतीने रविवारी (दि. ८) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील तेली समाज कार्यालयात संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष सत्यवान कहाणे यांच्या हस्ते करण्यात आले. खेडचे माजी उपसरपंच बाळासाहेब कहाणे, तालुका समता परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कहाणे, सुधीर येवले, अविनाश कहाणे, प्रमोद येवले, बाळासो येवले, धनंजय कहाणे, भारत हाडके, दिलीप लोखंडे, नामदेव कहाणे, उल्हास कहाणे, अशोक कहाणे, मनोज कहाणे, सचिन कहाणे, गणेश कहाणे, बबन वाव्हळ, विलास वालझाडे, सुनील कहाणे, दत्तात्रय कहाणे, अमोल कहाणे, शिवाजी खळदकर, शामकांत खळदकर, टेकवडे, सुनील घोडके, अविनाश कहाणे, जयप्रकाश कहाणे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावर्षी पासून संताजी महाराज जगनाडे यांची जयंती शासनाकडून राष्ट्रीय दिन म्हणून तसेच सर्व शासकीय कार्यालयात संताजी महाराज प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यास सुरुवात झाल्याने शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade