श्री. दिलीप गणपत खोंड (युटीलिटी ऑपरेटर) व्ही.व्ही.एफ. इंडिया लि. तळोजा, रायगड कंपनीत सन १९९४ पासून कार्यरत आहेत. अचूक काम, अधिक उत्पादन, सुरक्षा व उत्तम दर्जा या कामाच्या पद्धतीमुळे व्यवस्थापनाने गौरविले आहे. कंपनीच्या सर्व बसेसमध्ये फर्स्ट एड बॉक्स बसवण्याच्या संकल्पनेस व्यवस्थापनाने पुरस्कार देऊन कार्यान्वित केली. शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली आहे. व्ही.व्ही.एफ. लि. एम्प्लॉइज युनियनचे संचालक आहेत. व्ही.व्ही.एफ.लि. एम्प्लॉइज को-ऑप. क्रेडीट सोसायटीचे सक्रिय सभासद आहेत. समता साहित्य अकादमीने 'संताजी जगनाडे महाराज समता पुरस्काराने' सन्मानित केले आहे. बृहन्मुंबई तिळवण तेली समाज मुंबई, श्री.शनेश्वर सेवा संघ, ज्ञान प्रकाश क्रीडा मंडळ मुंबई, पुष्पवृष्टी मंगलमूर्ती चॅरीटेबल ट्रस्ट आदी संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थी गुणगौरव, बेरोजगारांना मार्गदर्शन, वधू-वर व पालक मेळावा, वरिष्ठ नागरिक ओळखपत्र मदतकार्य, कबड्डी सामने, कुटुंब साक्षरता अभियान असे कार्यक्रम राबविले आहेत. नुकताच त्यांचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्का प्रदान करून गौरवण्यात आले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade