मुदखेड नगर परिषद कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. तेली समाज बांधवांचे दैवत असलेले संत संताजी जगनाडे महाराज यांची दर वर्षी प्रमाणे याही वर्षी शासन परिपत्रक नुसार मुदखेड नगर परिषदचे मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांच्या उपस्थित पालिका सभागृहात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जगनाडे महाराज यांनी केलेल्या समाज कार्याच्या इतिहासावर पत्रकार ईश्र्वर पिन्नलवार यांनी आपले मनोगत प्रकट केले.
यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विनायकराव वच्छेवार, नगरसेवक लक्ष्मणराव देवदे, बंदेअली खॉ. पठाण, करीम खासाब, इमान मच्छीवाले, शहरप्रमुख सचिन चंद्रे, चादू चमकुरे, बबलु सेठ, संचालक सुरेश शेटे, गिरीश कोतावार, पत्रकार गंगाधर डांगे, दिनेश शर्मा, साहेबराव हौसरे, मुजीब अहेमद, सह किशन गिरी महाराज, कुन्हाल चौदते, संतोष टाक, कृष्णा देशमुख, पालिका कर्मचारी महोन कवळे, सुशिल खिल्लारे, आकाश बोकेफोड, महोण पांचाळ, सिद्दीकी साब, सुभाष चौदते, अमोल देवदे , सुरज राठोड , सघरतन चौदते यांच्या सह अदि उपस्थितीत होते .जयंती यशस्वी करण्यासाठी राम कुलूपवार, गंगाधर पगीरवार, चंदकांत पित्रलवार, बालाजी आजगुळकर, शिवाजी पिन्नलवार यांच्या सह अदि समाजबांधव उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade