राज्यस्तरीय तेली समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन

    अकोला -  राज्य तेली समाज समन्वय समितीच्यावतीने जळगाव जामोद संग्रामपूर तालुका तेली समाजाच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्यास समाज बांधवांनी कोरोना नियमाचे पालन करून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Appeal to attend the teli samaj vadhu var palak parichay melava Akola    कोरोनाच्या या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपापल्या वधू ब बरांचे लग्न जुळवण्यासाठी गावोगाव न फिरता जळगाव जामोद संग्रामपूर तेली समाजाच्या सहकार्याने वधू-वर परिचय जळगाव जामोद येथे सकाळी १० ते ५ या कालावधीत करण्यात आलेले आहे. यासाठी अकोला जिल्ह्यातील समाजबांधवांनी सहभागी व्हावे, म्हणून राज्य तेली समाज समन्वय समितीने आवाहन केलेले आहे.

    कोविड नियमांचे पालन करीत उपरोक्त सभा राज्य तेली समाज समन्वय समितीच्या अकोला कार्यालयात घेण्यात आली. यावेळी राज्याध्यक्ष प्रा प्रकाश दुबले, राज्य सरचिटणीस प्रशांत शेक्तकर, राज्य समन्वयक चंद्रशेखर देठे, राजेश पातळे, विकास राठोड, गोपाल निवाण, विजय थोटांगे, प्रवीण झापर्डे, विकास राठोड यांची उपस्थिती होती. यावेळी प्रस्तावित मेळाव्यासाठी रमेश अकोटकर , नंदकिशोर काथोट,संजय चोपडे, श्याम पांडव,शरद गोमासे, अनिल भगत यांनी मार्गदर्शन केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य अध्यक्ष प्रकाश डवले यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन राज्य सरचिटणीस प्रशांत शेवतकर यांनी केले.

आदर्श विवाहासाठी 5 हजारांचा पुरस्कार

    या उपक्रमाद्वारे वेळेवर लग्न जुळवून आदर्श विवाह केल्यास आयोजकांच्यावतीने ५ हजार रुपयांचे रोख पुरस्कार देण्यात येणार आहे.यासंबंधीचा अंतिम निर्णयआयोजन समितीचा राहील,असे आवाहन समस्ततेली बांधवांना करण्यात आले आहे.

दिनांक 14-12-2021 03:59:48
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in