नाशिक शहर तेली समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा मिलिंद वाघ यांच्या अध्यक्षतेखाली श्री संताजी मंगल कार्यालय अशोकस्तंभ येथे पार पडली. सभेचे इतिवृत्त व इतर सर्व विषय प्रवीण चांदवडकर यांनी वाचून दाखविले. आणि ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिकसाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात समाजाच्या अध्यक्षपदी मिलिंद वाघ यांची फेरनिवड करण्यात आली.
या सभेत निवडण्यात आलेली कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी उत्तमराव माधवराव सोनवणे, सचिव सुनील चंद्रभान शिरसाठ, खजिनदार हेमंत बहिरू कर्डीले, संचालक - यतीन रघुनाथ वाघ, गजानन दामोदर शेलार, भानुदास नारायण चौधरी, प्रवीण कांतीलाल पवार, प्रवीण रमेश चांदवडकर, नितीन मधुकर व्यवहारे, अंजली विजय आमले ,उषाताई शांताराम शेलार, वैशाली बाळासाहेब शेलार, तसेच सौ. हितेश यतिन वाघ आणि सुनील नामदेवराव क्षीरसागर यांची संचालकपदी नव्याने निवड करण्यात
शेलार आली.
या सभेस कैलास बाबुराव शेलार, सरिता सोनवणे, सोनाली रायजादे यांच्यासहक समाज बांधव उपस्थित होते. येणाऱ्या कालावधीत समाजाच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचा मनोदय नवनिर्वाचित कार्यकारिणीने याप्रसंगी व्यक्त केला. अध्यक्ष मिलिंद बाबुराव वाघ यांचा निवडीबद्दल सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष उत्तमराव सोनवणे यांनी आभार मानले. वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade