खान्देश तेली समाज मंडळ व प्रदेश तेली महासंघ आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

४५१ विद्यार्थ्यांचा गुणगौरव

    धुळे - खान्देश तेली समाज मंडळ व प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २८ रोजी कल्याणी लॉन्स, नकाने गाव या ठिकाणी तेली समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.

Khandesh teli Samaj Munda va Pradesh Teli mahasangh aayojit Vidyarthi gunahgaro Sohala Sampanna     या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री विजय भाऊ चौधरी उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, माजी केंद्रीय मंत्री खा. सुभाष भामरे, महापौर प्रदीप कर्पे, मा. आमदार शिरीष दादा चौधरी ,मा.स्थायी सभापती सतीश तात्या महाले, चोपडा येथील गटनेते जीवन भाऊ चौधरी ,राष्ट्रीय ओबीसी संघाचे सुभाषजी घाटे नागपूर, नगरसेविका प्रतिभाताई चौधरी, माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, प्रदेश तेली महासंघाच्या महिला अध्यक्ष प्रियाताई महिंद्रे, कल्पनाताई तलमले, जळगाव जिल्हाध्यक्ष निर्मलाताई चौधरी, नगरसेविका पुष्पाताई बोरसे, नगरसेवक हिरामण आप्पा गवळी, भिकन आप्पा वराडे, संगीताताई चौधरी सुरत, नगरसेविका मंगलताई चौधरी,गुड्डू भाऊ अहिरराव, मोतीलाल शेठ चौधरी, रमेश उचितसर मालेगाव, शामराव चौधरी बीड, माजी नगरसेवक राजूनाना चौधरी, भैय्या पहिलवान, सचिन भाऊ मिसाळ जालना,श्याम ईशी शिरपूर, शिंदखेडा येथील नगरसेवक सुनीलभाऊ चौधरी, नरेश आप्पा चौधरी नगरसेवक, नंदुरबार येथील नगरसेवक संजय मक्कन चौधरी ,बापू पवार गुरुजी चाळीसगाव, तेली समाजाचे सचिव युवराज महादू चौधरी, रामेश्वर बापू चौधरी, कैलास आधार चौधरी, रवींद्र जयराम चौधरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Khandesh teli Samaj Munda aayojit Vidyarthi gunahgaro Sohala Sampanna    यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जयदत्त क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांनी असेच चांगले गुण मिळवून पुढे जात राहावे. समाजाचा विकास करण्यासाठी भविष्यात त्यांनी हातभार लावा असे आवाहन केले. माजी केंद्रीय मंत्री खा. सुभाषजी भामरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.मा.आ.शिरीष दादा चौधरी यांनी तेली समाजातील विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह बांधण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले तर अध्यक्ष स्थानावरून बोलताना विजय चौधरी यांनी समाज संघटित झाला पाहिजे, समाज एकत्र आला पाहिजे त्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे सांगितले. महापौर प्रदीप नाना कर्पे यांनी तेली समाजाने आजपर्यंत भरपूर सहकार्य केले त्या सहकार्याची परतफेड आता मी महापौर पदावरून करेल असे आश्वासन दिले. प्रस्ताविकातून मंडळाचे सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी समाज संघटित होण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह असावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Pradesh Teli mahasangh aayojit Vidyarthi gunahgaro Sohala Sampanna    यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा पदाधिकारींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तेली समाजाचे प्रतीक असलेला तेल घाणा हा जयदत्त क्षीरसागर यांना नरेश आप्पा चौधरी यांचेकडून भेट देण्यात आला .कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून माल्यार्पन करण्यात आले. कार्यक्रमासाठी हजारो समाजसेवक बंधू भगिनींची उपस्थिती होती. सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते आकर्षक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध पदांवर निवड, नियुक्ती झालेले व समाजातील अधिकारी वर्गांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. त्यामध्ये जळगाव येथील न्यायाधीश माधुरी ताई चौधरी, नाशिक येथील आरटीओ मनीषा ताई चौधरी, रोहित दादा बत्तीसे, दीपक नवल चौधरी सर ,प्राध्यापक लक्ष्मण चौधरी पुणे, जागतिक क्रीडापटू आकांक्षा व्यवहारे चे पालक, डॉ.विनायक चौधरी बीड, अश्विनी जयवंत चौधरी या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक नरेश आप्पा चौधरी, खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, तालुका अध्यक्ष भटूबापू चौधरी, उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी, अमोल हिरामण चौधरी, चंद्रकांत श्रीराम चौधरी,राहूल यशवंत चौधरी, गोविंद भाईदास चौधरी, राकेश पुंडलिक चौधरी,रघुनाथ फुलचंद चौधरी, रामभाऊ सिताराम चौधरी, सुनील रघुनाथ चौधरी, गिरीश राजाराम चौधरी, गजेंद्र फुलचंद चौधरी ,कमलेश कैलास चौधरी, महेश दौलत चौधरी, प्रकाश शंकर चौधरी चोपडा, दीपक सुरेश चौधरी, सुनील रामदास चौधरी, रवींद्र हरिश्चंद्र चौधरी, चंद्रकांत रूपला चौधरी, हर्षल सुदाम चौधरी, सुभाष दगा चौधरी, किशोर सदाशिव चौधरी, नंदू चौधरी शिरूड, सुनील चौधरी बोरकुंड ,सुनील चौधरी नेर, पंकज चौधरी कुसुंबा, दत्तू चौधरी कुसुंबा, श्याम चौधरी कुसुंबा, वासुदेव चौधरी जामनेर , दिनेश चौधरी शिरपूर, किशोर चौधरी वाघाडी, महिला आघाडीच्या सौ.मालती सुनील चौधरी, सौ.सविता प्रताप चौधरी, सौ.भारती चौधरी ,सौ.भारती चौधरी (जळगावकर) सौ. रंजना चिलंदे, सौ.समिधा सुर्यवंशी, श्रीमती लताताई चौधरी, सौ. मनीषा चौधरी, सौ.शुभांगी चौधरी, सौ. वंदना चौधरी, श्रीमती शोभाताई चौधरी, नंदुरबार, श्रीमती सोनल जाधव जामनेर, श्रीमती स्वाती चौधरी जामनेर यांनी नावनोंदणी साठी अथक परिश्रम घेतले.

    गुणगौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन वाहिद अली सैय्यद,कु.रूपाली कन्हैयालाल चौधरी, रत्नप्रभा बागुल पिंपळनेर व सहकारी यांनी केले.चि.चिन्मय सुनील चौधरी,विरदेल या बालकाने स्वागत गीत सादर केले.

दिनांक 31-08-2022 23:42:15
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in