भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जेष्ठ नेते मा. आ. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब दि.१२ सप्टेंबर २०२२ रोजी धुळे दौऱ्यावर येत आहेत. सत्ताधारी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पद प्रथमच तेली समाजाच्या व्यक्तीला मिळाले आहे त्यामुळे आदरणीय बावनकुळे साहेब यांचा तेली समाजाच्या वतीने भव्य सत्कार व सामाजिक संवाद कार्यक्रम आयोजित करावयाचे असल्याने सदर कार्यक्रम नियोजनकरिता आज रविवार दि. ४ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजता महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सर्व आघाडी पदाधिकारी व समाज बांधवांची बैठक ग. नं. २ अनिल भाऊ अहिरराव यांच्या घराखाली, जैन मंदिर समोर, ग. नं. २, लालबाग, धुळे येथे खेळीमेळीचे वातावरणात जेष्ठ मार्गदर्शक श्री नरेंद्र भाऊ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सम्पन्न झाली. बैठकीच्या सुरुवातीला दिलीप भाऊ सुर्यवंशी यांनी सत्कार समारंभ विषयावर माहिती दिली भव्य दिव्य सत्कार समारंभ करण्याचा एक मताने ठरविण्यात आले
सदर बैठकीत समाज बांधवांनी आदरणीय श्री बावनकुळे साहेब यांचा भव्य दिव्य असा सत्कार समारंभ करण्याचा निर्धार व्यक्त केला. सदर बैठकीला उपस्थित मान्यवर यांनी सत्कार समारंभाचा कार्यक्रम करणे संदर्भात सुचना मांडल्या तसेच जेष्ठ मार्गदर्शक नरेंद्र भाऊ चौधरी , श्री शशिकांत भाऊ चौधरी, अनिल भाऊ अहीरराव, पोपटराव चौधरी, विनोद तात्या थोरात, कैलासभाऊ चौधरी, अदींनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम कोठे करावा या बाबतीत समाज भवन, मंगल कार्यालय, नाट्यगृह, अदींची माहिती घेऊन निश्चित करण्यात येणार आहे.
सदर बैठकीसाठी तुषार दादा चौधरी, रमेश शंकर करनकाळ, महेश चौधरी, हिरु आप्पा चौधरी, अनिल थोरात, कल्पेश चौधरी, गणेश चौधरी, नितीन चौधरी, मनोहर चौधरी, जितेंद्र चौधरी, पंकज चौधरी तुषार चौधरी भटु भाऊ चौधरी प्रमोद चौधरी चंद्रकांत चौधरी कुणाल चौधरी राजू चौधरी यशवंत चौधरी अनिल थोरात दिलीप सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते समाज बांधव उपस्थित होते पुढील कार्यक्रम भाव्य दिव्य होणार.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade