श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड या संस्थेच्या वतीने आज सौ. निशाताई यशवंत करपे यांचा पुणे पीपल्स को-ऑप. बँकेच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला. सौ. निशाताई करपे या गेल्या वीस वर्षांपासून समाजातील विविध संस्थांच्या उच्च पदांवर कार्य करीत आहेत. तसेच त्या समाजाबाहेरील संस्थांवरही कार्यकर्त्या म्हणून कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुणे पीपल्स को-ऑप. बँकेच्या मान्यवर संचालकांनी त्यांना पंचवार्षिक निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी दिली. त्यांच्या सामाजिक कार्याची पावतीम्हणून आज त्या संचालकपदी निवडून आल्या आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊल कोथरूड येथील श्री संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रमेश भोज यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निशाताई यांचा सत्कार करण्याचे ठरविले.
कोथरूड येथील श्री संताजीभवन येथे हा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संताजी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री. दिलीप शिंदे यांनी केले. अध्यक्ष श्री. रमेश भोज यांनी निशाताई यांच्या कार्याविषयी माहिती दिली. तसेच तिळवण तेली समाज संस्थेचे माजी अध्यक्ष श्री. संजय भगत, सामाजिक कार्यकर्त्या सौ. राजेश्वरी चिंचकर, चंद्रकांत जगनाडे यांनीही निशाताई यांच्या कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी तिळवण तेली समाज संस्थेचे माजी अध्यक्ष श्री. विठ्ठलराव बा. किरवे, संस्थेचे पदाधिकारी श्री. वासुदेव गुलवाडे, श्री. पंडित चौधरी, प्रा. डॉ. शंकरराव पवार, श्री. मधुकर गुलवाडे, श्री. रवींद्र उबाळे, श्री. कमलाकर करपे, श्री. राजेंद्र वि. किरवे, श्री. प्रकाश देशमाने, सौ. राजेश्वरी चिंचकर, रामचंद्र वाचकवडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. डॉ.शंकरराव पवार यांनी संस्थेच्या वतीने उपस्थितांचेवमान्यवरांचे आभार मानले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade