प्रदेश तेली महासंघाच्या वतीने रविवारी श्री संताजी जगनाडे महाराज उद्यान, सेव्हन लव्हज चौक येथे दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगरसेवक अविनाश बागवे, महासंघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विजयभाऊ रत्नपारखी आणि उद्योजक उमेशशेठ किरवे, प. महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष सौ. निशाताई करपे व जिल्हा अध्यक्ष सौ. उज्वलाताई पिंगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच बहुसंख्येने संघाचे महिला व पुरुष पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प. महाराष्ट्र अध्यक्ष संतोष माकुडे, जिल्हाध्यक्ष रमेश भोज, कार्याध्यक्ष दिलीप शिंदे, सचिव गणेश पिंगळे, शहराध्यक्ष सुरेंद्र दळवी यांनी संघाच्या विस्तारवाढी संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्वांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. धनंजय वाठारकर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. सुरेंद्र दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade