भिवापूर : उमरेड येथील नगरपरिषद व महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा यांच्या सयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाल उपाध्याय सभागृह येथे जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधून विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या ५१ महिलांचा सन्मान खासदार कृपाल तुमाने, आमदार राजु पारवे, माजी आमदार सुधीर पारवे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, मुख्याधिकारी मंगेश खवले, नागपूर सुधार प्रन्यास चे सदस्य संदीप इटकेलवार, विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यात उमरेड मतदार संघ कार्यक्षेत्र असलेल्या पब्लिक वेब डिजिटल चॅनलच्या महिला पत्रकार व माजी नगरसेविका निशाताई जांभुळे यांचा सन्मानचिन्ह व शाल, श्रीफळ, रोपटे देवून मान्यवराच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला महिलाची लक्षणीय उपस्थिती होती.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade