पैठणः प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य सोलार इंडस्ट्रीज उद्योजकांची पुणे येथे झालेल्या महाराष्ट्रव्यापी परिषदेमध्ये कमी वयात सर्वोत्कृष्ट सोलार उद्योगात कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य युवा उद्योजक (सोलार ऑफ द इयर या पुरस्काराने अजिंक्य भगवान मिटकर यास सन्मानीत करण्यात आले.
पैठण येथील अजिंक्य भगवान मिटकर यांनी सूयीदय सोलार या नावाने खाजगी कंपनी नोंदणी करुन या उद्योगात यशस्वी भरारी घेतली आहे, मिटकर यांनी तांत्रिक आभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसाय करण्याची आवड असल्याने काही तरी स्वतःचा व्यवसायात करण्याची जिद्द दाखवून त्याने सोलार व्यवसायात यशस्वी भरारी घेतली आहे. सद्यस्थितीत त्याने पैठण, नेवासा, अंबड, गेवराई व पुणे इत्यादी ठिकाणी सोलार प्रकल्पाचे विविध कामे पूर्ण केली आहेत, त्याला या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्यानंतर त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade