''अवघा समाज जाणतो तुमच्या यशाची चाहूल,उन्नती आणि प्रगतीच्या दिशेने आपले सतत पडत राहो पाऊल..."
जवाहर विद्यार्थी गृह संस्थेतर्फे शालांत परीक्षेत मेरिट आलेल्या गुणवंतांचा, Ph.D. प्राप्त व CA उत्तीर्ण गुणवंतांचा, क्रिडा क्षेत्रातील गुणवंतांचा तसेच संस्थेच्या ज्येष्ठ आजीवन सभासदांचा विशेष सत्कार पश्चिम नागपूरचे आमदार विकासभाऊ ठाकरे, प्रा. डॉ. संजय ढोबळे, सौ. दिपाताई हटवार ,मा.बाबूरावजी वंजारी यांच्या उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी मा. रमेशभाऊ गिरडे होते. यावेळी 52 पेटंट मिळविल्याबद्दल प्रोफेसर/शास्त्रज्ञ डॉ संजय ढोबळे यांचा सत्कार करण्यात आला. सुञ संचालन प्रदीप लाखे, प्रास्ताविक शंकरराव भुते आणि आभारप्रदर्शन मिलिंद माकडे यांनी केले.
यावेळी श्री गुलाबराव जुननकर, शेषराव सावरकर, घवघवे, टापरे, ढोबळे, सौ बबिता मेहर, प्रमोद महाजन, दादा इटनकर, कामडे, अजय धोपटे, सुनील मानापुरे, चन्ने, रोकडे, वंजारी, चकोले, रामू वंजारी, बोरकर, महाकाळकर, साठवणे, नाना ढगे, सावरकर व समाजातील अन्य मान्यवर मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व आयोजन केल्याबद्दल जवाहर विद्यार्थीगृहाचे आयोजक समाजबांधवाचा चेहर्यावर वेगळाच उत्साह व आनंद यावेळी बघायला मिळाला.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade