अकोला - व्याळा येथे दिनांक 9/1/2024 वार मंगळवार स्थानिक संताजी चौक येथे मानवतेचा महान विचार देणारे संत संताजी जगनाडे महाराज जगनाडे पुण्यतिथि निमित्ताने प्रमुख मान्यवराच्या उपस्थितीत अभिवादन सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख उपस्तिथि मध्ये जिल्हा परिषद अकोला चे माजी अध्यक्ष बालमुकुंद भिरड, वंचित बहुजून आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, सामाजिक कार्यकर्ते गोपाल राऊत, प्रा. डवले सर, ॲड. देवाविश काकड, योगेश गोतवारे, मनोज जुमळे, प्रशांत शेवतकार, रमेश गोतमारे इ. प्रमुख मान्यवरांची उपस्थित होती या प्रसंगी मान्यवरांनी संताजी जगनाडे महाराजांच्या महान कार्याला उजाळा दिला याप्रसंगी समाजबांधवाच्या वतीने या भागातील खुल्या जागेवर सुशोभिकरण करून या ठिकाणी सभागृह निर्मितीचा आणि उद्यान करण्याचा मानस बोलून दाखविला मान्यवरांनी यास मागणिला पाठींबा दिला.
कार्यक्रमाचे संचालन देवर्षी देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन नितीन जुमळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी अक्षय वारकरी, योगेश राठोडे, गजानन राऊत, अमोल इसोकार, विठ्ठल सोनटक्के यांनी सहकार्य केले. कार्यक्रम प्रवंगी मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade