नागपूर - तेली समाज विकास संस्था, मौदा मार्फत दि. ८ डिसेंबर २०२४ रविवारला येथे संताजी भवन, मौदा, जि. नागपूर श्री. संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रक्तदान करून प्रबोधनात्मक साजरी करण्यात आली. याप्रसंगी जगदिश वाडिभस्मे, ऍड. मृनाल तिघरे यांनी संताजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकत संत तुकाराम महाराजांचे अभंग संताजी महाराजांमुळे समाजाला मिळाले हे मोठे कार्य संताजींनी केले तसेच त्यांनी समाज जागृतीचे कार्य केले आणि संतांची शिकवण हि स्वातंत्र्य, समता, बंधुता, विज्ञानवादी, मानवतावादी, दया, प्रेम होती आणि त्या शिकवनीची आजही समाजाला आवश्यकता आहे, पण वर्तमानात संतांचे विचार मारल्या जात आहेत. असे मत वक्त्यांनी मांडले.

कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने मौदा शहर व तालुक्यातील समाज बांधव, विद्यार्थी, डॉक्टर उपस्थित होते. आणि अध्यक्ष म्हणून भाऊराव धनजोडे उपस्थित होते, तर संचालन योगेश आंबागडे यांनी केले
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade