"श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था महाराष्ट्र" या संस्थेच्या वतीने तेली समाजाचे दैवत श्री संताजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्री संताजी महाराज यांचे प्रतिमेला माननीय नितीन तुपे आरपीआय साताऱ्याचे अध्यक्ष, आमचे संघटनेचे जिल्हा समन्मावयक माननीय पोपटराव भोज व सातारा तालुका समन्वयक माननीय शिवाजीराव गंधाले, माननीय मोरे सर, सामाजिक कार्यकर्ते, सातारा तालुका अध्यक्ष माननीय अनिल किरवे व माननीय संतोष दळवी सहाय्यक तहसीलदार सातारा यांच्या हस्ते पुष्प वाहण्यात आली व विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

श्री संताजी महाराज यांचे पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करताना आरपीआय संघटनेचे अध्यक्ष माननीय नितीन तुपे म्हणाले संताजी महाराजांचे विचार समाजापर्यंत पोचणे गरजेचे आहे. संताजी महाराज होते म्हणून तुकाराम महाराजांचा एवढा ठेवा समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. खरे तर ओबीसी समाज व आम्ही बंधू बंधू आहोत आणि खऱ्या अर्थाने आज ओबीसी समाज आणि आमची ताकद एकच राहिल्यास समाजामध्ये वेगळ्या प्रकारची क्रांति होईल. यावेळी सहाय्यक तहसीलदार माननीय संतोष दळवी यांनी आपले विचार मांडताना म्हणाले आज समाजाला खऱ्या अर्थाने बदलणे गरजेचे आहे. संताजी महाराजांचे विचार खऱ्या अर्थाने कृतीमध्ये येण्याची गरज आहे तरी आम्ही आज मेळावे आणि गंगापूजन याच्या मध्येच अडकून पडलेला आहोत. आज ज्यांना आम्ही मागास म्हणतो ते आमच्यापासून कितीतरी पुढे निघून गेलेले आहेत. ओबीसी समाजाला खऱ्या अर्थाने याचा विचार केला पाहिजे व आपल्यामध्ये बदल घडवून आणले पाहिजेत.
संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी व समाज बांधव यांना संबोधित करताना संघटनेचे अध्यक्ष राम पडघे म्हणाले संघटनेमार्फत श्री संताजी महाराजांचे स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात येत आहे. आज या कार्यक्रमासाठी आरपीआयचे अध्यक्ष माननीय नितीन तुपे साहेब या ठिकाणी हजर राहिले व त्यांनी स्वतः पुष्प वाहून संताजी महाराजांच्या स्मृतीस अभिवादन केले हे खरे तर फार मोठ्या बदलाचे संकेत आहेत. संताजी महाराजांचे विचार त्यांनी ज्या प्रकारे आता मांडले हे पाहून निश्चित समाधान वाटले की संताजी महाराज आज सर्व समाजाला ज्ञात होत आहेत व त्यांचे विचार सर्वांना पटत आहेत. संताजी महाराजांचे आशीर्वादाने संघटनेचे काम अत्यंत उत्कृष्टपणे सुरू असून संघटनेमार्फत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. नुकताच महाबळेश्वर तालुक्यातील अत्यंत दुर्गम व मागास जनजातीला कौटुंबिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे निमित्ताने सर्व समाजातून संघटनेचे अभिनंदन करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील तेली समाजाची कौटुंबिक माहिती एकत्रित करून करण्याची फार मोठी मोहीम संघटनेमार्फत राबविण्यात येत आहे. आज समाजापुढे असलेल्या गंभीर प्रश्न मुला मुलींचे लग्न जुळवणे हा आहे. यासाठी संघटनेमार्फत ही माहिती एकत्र करण्याचा फार मोठा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याच्यासाठी संघटनेने स्वतंत्र एप्लीकेशन तयार केलेले असून त्याची लिंक गरजू बांधवांना पाठवण्यात येत असून त्या अन्वये माहिती एकत्रित करून ज्या बांधवांना त्याच्या आवश्यकता असेल त्यांना त्याचा पुरवठा केला जात आहे.आज ह्याला समाजातून अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अशा प्रकारचा कार्यक्रम यापूर्वी सुरू करायला हवा असे अनेक अभ्यासू समाजबांधव आपले मत व्यक्त करत आहेत.यावेळी संघटनेच्या भविष्यकालीन कार्यक्रमाविषयी चर्चा होऊन या अत्यंत पवित्र दिनी जयंती कार्यक्रम अत्यंत उत्साहाने पार पाडून आजची सभा पूर्ण करण्यात आली. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष माननीय विठ्ठलराव शिरसागर प्रदीप देशमाने सातारा तालुका अध्यक्ष अनिल किरवे सातारा जिल्हा समन्वयक पोपटराव भोज सातारा तालुका समन्वयक शिवाजीराव गंधाले, संतोष दळवी, आर पी आय चे अध्यक्ष नितीन तुपे सामाजिक कार्यकर्ते मोरे सर व संघटनेचे अध्यक्ष राम पडघे उपस्थित होते.
सर्व जमलेल्या समाज बांधव पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांचे आभार माननीय प्रदीप देशमाने यांनी मांनले व कार्यक्रम समाप्त केला.
आपला - राम पडघे - अध्यक्ष श्री संताजी शैक्षणिक सामाजिक विकास संस्था, महाराष्ट्र
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade