मंगळवेढा (जि. सोलापूर)। संत तुकाराम महाराजांचे प्रिय शिष्य, अभंग गाथेचे रक्षक व तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंदाची जयंती मंगळवेढ्यातील श्री संत दामाजी मंदिरात अतिशय भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. हा सोहळा वीरशैव लिंगायत तेली समाज मंगळवेढा व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी संताजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार, हरिद्रा-कुंकू व आरतीने झाली. त्यानंतर भजन-कीर्तनाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून निघाला. उपस्थितांनी संताजी महाराजांच्या अभंगांचे समूह गायन केले आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांची आठवण करून घेतली. अध्यक्षस्थान श्री दत्तात्रय अंबादास घोडके (वीरशैव लिंगायत तेली समाज, मंगळवेढा) यांनी भूषवले.
या सोहळ्याला ज्येष्ठ समाज बांधव श्री दामोदर राऊत, उमाकांत चिंचकर, सिद्धेश्वर घोडके, नागेश राऊत, अशोक देशमाने, शरद राऊत, भारत देशमाने, दगडू देशमाने, हरिभाऊ राऊत, दिलीप भ. देशमाने, प्रभाकर वेदपाठक, सागर राऊत, रोहन राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन संताजी महाराजांच्या शिकवणी – निस्वार्थ सेवा, प्रामाणिकपणा, शिस्त आणि सामाजिक बंधुता – नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला.
आयोजकांनी सर्व उपस्थितांचे मनापासून आभार मानले आणि पुढील वर्षीही असाच उत्साहपूर्ण सोहळा आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
जय संताजी महाराज! जय तेली समाज! ????
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade