यवतमाळ : संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ व्या जयंतीनिमित्त सोमवारी येथील संताजी जगनाडे चौकात (माईंदे चौक) संताजी पाडवा पहाट कार्यक्रम पार पडला. यामध्ये संताजी महाराजांच्या जीवनावरील गीतांचा समावेश करून आध्यात्मिक गीते, भावगीते सादर करण्यात आली. यावेळी सादर झालेल्या गीतांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.

पाडवा पहाट कार्यक्रम सुनील गुल्हाने, प्रा.अतुल शिरे व संचाने सादर केला. विजया शिरभाते, शीला गायकवाड, अखिलेश गुल्हाने, सचिन वालगुंजे, गणेश गवई आदींचा यामध्ये सहभाग होता. संचालन अर्चना शेरजे यांनी केले. आशिष कठाने, वैभव गुल्हाने, रक्षक रणधीरे, नितीन डेहनकर, दीपाली मंगेश काळे, दीपाली खासरे, अॅड. संजीव गभणे, रवी चरडे आदींनी सहकार्य केले.
संताजी सृष्टी, अखिल तेली समाज महासंघ, संताजी नागरी सहकारी पतसंस्था आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. विलास काळे, ज्ञानेश्वर रायमल, किशोर थोटे, अॅड. आनंद रुईकर, अनिल जिपकाटे, ह. भ. प नरेंद्र रामेकर, विजय गुल्हाने, किशोर डाफे, गजाननराव टाके, लीलाधर वाघमारे, नरेश भागडे, सुनील महिंद्रे, गजानन गुल्हाने, देवराव जिपकाटे, अविनाश राजगुरे, सुनीता काळे, योगिता गुल्हाने, माधुरी फेडर, सुनीता अनिल काळे, भावना राजेश गुल्हाने, अनिल काळे, गुलाबराव भोळे, भास्करराव देशमुख, गजानन गुल्हाने आदींनी पुढाकार घेतला.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade