पाईकाचे अभंग, शिवराय, संताजी व मोंगल निष्ठ उच्चवर्णीय

तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग2)

    गुलामगीरीची झळ संत संताजींनी अनुभवली होती, घाण्याचा किरकिर आवाज येतो म्हणुन मावळतीला वसवले होते. त्या वस्तीत तेलघाना घेताना कपडे तेलकट मळकट होत होते म्हणुन तेली आडवा जाणे व तेत्याचे तोंड अशुभ आहे हे सांगणारे ब्राह्मण शाहीच्या शास्त्राने त्यांना पोळले होते. शुद्र व सर्व स्त्री जात अशुभ आहे हे बिंबवले होते. देवाच्या दारात दिवसरात्र तेवणारा नंदा दिप तेल आहे म्हणुन जरी तेवत असला तरी तो तेल उत्पादक अशुभ ठरवणारे शास्त्र संताजींना अस्वस्थ नक्कीच करीत होते. धर्मशास्त्रावर समाज बेतावे तसे होते तसेच त्यावेळचे मामलेदार तलाठी हे सारा गोळा करणारे होत. न्याय दान करणारे त्या त्या धर्माच्या पातळीवर होते. सारा गोळा करणारी ही मंडळी उच्चवर्णीय होते त्यांची म्हणजे ब्राह्मण व क्षत्रीय यांची भक्कम पक्कड मुसलीम राजवटीत होती. धर्मात हे अग्रेसर तर राज्यकारभारात तेच भक्कम मुठभर ढिगभरावर हुकुम गाजवत होते. आशा या सामाजीक अवस्थेला खिंडार पाउण्या साठी तुकोबा पहिले उभे राहिले. जोडीदार गोळा केले म्हणन्या पेक्षा पोळलेल्या होरपळलेल्या जात समुहातील लोकप्रनिधी सामील झाले. काही सामाजीक जाणीवीतुन सामील झाले. त्या पैकी कडुसकर एक ब्राह्मण होते आशा या मंडळींनी विठ्ठलाला व पांडुरंगाला समोर ठेवले. कारण पंढरपुरात शैव पंथी  पांडुरंगाचे कितीही वैष्णवी करण केले तरी पांडुरंगाचे शैव पण आज स्पष्ट नजरेत भरते. इ. स. 1200 मध्ये पहिले पांडुरंग माहात्म लिहिले त्यात शैव पणाचा अंश आहे. पण टप्या टप्याने विठ्ठलाचे वैष्णवी करण जरी केले असले तरी मुळ विठ्ठल मुर्तीचा आज सहज सापडत नाही. ही उच्चवर्णीय मंडळींची शेकडो वर्षांची चाल आहे. मुळ प्रश्‍न आसा त्या वेळच्या ब्राह्मणशाहीची ही वाटचाल इतकी मी पणा साठी लढणारी होती. त्याच वेळी संत तुकारमासारख्या जागत्या घरंदाज घरातील मणुस समतेचे शास्त्र घेऊन उभा रहतो. याच वेळी, संताजी, नमाजी माळी, गवारशेठ सारखी मंडळी सामील होतात. आपल्या शब्दांच्या शस्त्रांने या जुलूम शाहीच्या विरोधात चार हात करतात. आपल्या घरात पैशाचे धन जरूर नाही परंतू शब्द रूपी धन आहे हे धन ते जनमानसात वाटतात. या शब्दातुन नैतिक बळे घेऊन परिसरातील कुणबी, लोहार, सुतार, तेली माळी या जातीतले असंख्य जन शिवरायांच्या  खांद्याला खांदा लावुन लढतात. त्यापुर्वी त्या नंतर ही शिवराय तुकोबांच्या भेटी होतात. या भेटी फक्त तुकोबा व शिवराया या दोघांतच झाल्या असे ही नव्हे तर  देहु येथील मुक्कामात किंवा इतर ठिकाणी तुकोबा बरोबर संताजी, नमाजी, गवार शेठ, कडूसकर ही मंडळी असणारच स्वातंत्र्य म्हणजेनक्की काय ? गुलामगीरी म्हणजे नक्की काय ? धर्मशास्त्र म्हणजे काय ? यावर चर्चा होत असणारच. या वेळी संत तुकोबांनी लिहीले पाईकाचे अभंग शिवराय महाराजांना हे पाईकाचे अभंग म्हणजे एक प्रेरणा किरण होते. मात्र धर्मावर पक्कड ठेवणारे व मोंगल सत्तेचा प्रशासनाची कणा असलेली ब्राह्मणशाही. या भेटीच्या वेळी त्यांच्या विरोधात कट कारस्थाने करणे कर्तव्य व मोंगल शाही राबवणे म्हणजे धर्म वाचवणे मानत होती. sant santaji jagnade maharaj

दिनांक 21-03-2016 18:11:53
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in