औरंगाबाद तेली समाज - संताजी जगनाडे महाराज यांची कार्य सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी केली. संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम चेतना नगर ते पार पडला. श्री गायकवाड म्हणाले की संताजी महाराज जगनाडे यांनी संत तुकाराम महाराजांचे अभंग लिहून काढण्याचे कार्य केले. हे अभंग लिहून झाल्यामुळे मनुवादी मंडळींना चा पकार बसली. या अभंगामुळे समाजाची आजही प्रबोधन होत आहे. तुकारामांचे बहुतेक अभंग संताजी जगनाडे व त्यांच्या सहकाऱ्यांना मुखोद्गत होते. त्यामुळे ती पुन्हा लिहून काढणे शक्य झाले. संताजी महाराज यांनी केलेले कार्य विसरण्यासारखे नाही. यावेळी ती सीनेची संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, अशोक लोखंडे, सुनील क्षीरसागर, विनोद मिसाळ, अशोक क्षीरसागर, दत्तू हिरे, महेश राऊत यांची उपस्थिती होती

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade