अंदरसूल : येथील ग्रामपंचायत कार्यालयात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच प्रा. विनीता सोनवणे होत्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवारांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राजेंद्र सोनवणे यांनी संत शिरोमणी जगनाडे यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. अंदरसूल उपबाजार समितीचे सभापती मकरंद सोनवणे, सरपंच सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी अमोल सोनवणे, जनार्दन जानराव, सुवर्णा बागुल, स्वाती शिनगारे, राजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade