अहमदनगरचा आदर्श तेली समाज  वधु - वर मेळावा  १ डिसेंबर २०१९ (वर्ष ३ रे )

     इवलासा वेल लाविला...... आज थोडे मागे वळून पाहिले.... तर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बघता बघता दोन वर्षं झाली... आमच्या अहमदनगरच्या ...आदर्श असा म्हणण्यास लावणारा हा वधू वर मेळावा पाहता पाहता तिसऱ्या वर्षात सुद्धा तितक्याच उत्साहाने यशस्वीपणे साजरा झाला. दिनांक १ डिसेंबर २०१९ रविवार रोजी झालेल्या या मंगल दिनी, ऐतिहासिक दिनी अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज, संताजी विचारमंच अहमदनगर याच बरोबर सर्व समाज बंधू-भगिनी यांच्यावतीने आयोजित.... भव्यदिव्य वधू-वर पालक परिचय मेळावा २०१९ अहमदनगर शहरातील स्वर्गीय श्रीमती आशाताई रमेश भोज सभागृहात (माऊली सभागृहात) मोठ्या उत्साहाने पार पडला.हा मेळावा खऱ्या अर्थाने मोफत भव्य दिव्य वधू-वर पालक परिचय मेळावा ठरला ....ह्यात काही शंकाच नाही. ह्या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या समाज बांधवांचे स्वागत करण्यासाठी...मग तो समाज बांधव लहान असो, थोर असो, जेष्ठ असो, श्रेष्ठ असो, गरीब असो, श्रीमंत असो, नोकरदार असो, व्यावसायिक असो.. सर्वांचेच अतिशय उत्साहाने, प्रेमाने, आपलेपणाने आणि मेळाव्यातील प्रत्येक कार्यकर्त्याने स्वागत करून, यथोचित सत्कार करून,दोन शब्द प्रेमाचे बोलून चहापान, नाश्त्यासाठी, जेवणासाठी आपुलकीने, विचारणा करत होता ....ज्यामधून अतिशय आपलेपणाची भावना जाणवत होती ....आणि हा मेळावा सामाजिक मेळावा नसून . . . जणूकाही.... आपल्या स्वतःच्या घरचा लग्न सोहळा आहे . . . असे समजून प्रत्येकजण...आलेल्या समाज बांधवांशी प्रेमाने...वागत असताना दिसत होता. मला असे वाटते.... हेच तर वेगळेपण होतं...या आमच्या अहमदनगरच्या वधू-वर परिचय मेळाव्याच.

Ahmednagar Teli Samaj Adarsh Vadhu Var Melava     तसे पाहिले तर .....एवढ्या मोठ्या प्रमाणावर, असा भव्य मेळावा ठरवणे.....आणि प्रत्यक्षात यशस्वी करून दाखवणे .....ही एवढी सोपी गोष्ट नाही......आणि मुख्य म्हणजे.....हे कोणा.... एका व्यक्तीचे काम नाही. मग मेळावा यशस्वी करण्यासाठी काही,मुख्य गोष्टी लागतात ......त्या म्हणजे निधी, मनुष्यबळ,कार्य नियोजन, अंमलबजावणी आणि पुस्तिका तयार करण्यासाठी लागणाऱ्या पात्र, इच्छा असलेल्या मुलाची किंवा मुलीची संपूर्ण माहिती आणि.... त्याच बरोबर जाहिरात दारांची जाहिरात हे सर्व गोळा करणे ......आणि ते सर्व प्रत्यक्षात उतरवताना आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी हे डोंगराएवढे...... कार्य अतिशय उत्साहाने पार पडले. मला इथे आपणास सांगताना विशेष आनंद होत आहे... यावर्षी सुद्धा या मेळाव्यासाठी चा आर्थिक भार .....अहमदनगर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी उचलला.... आणि एक नव्हे ,दोन नव्हे तर ....एकूण ३६ जणांनी हा भार आपापल्या पद्धतीने..... खारीचा वाटा म्हणून उचलला आणि.... कोणतेही आढेवेढे न घेता मागील दोन वर्षीच्या मेळाव्याचा अनुभव पाहता..... स्वतःहून आपला निधी सढळ .....हाताने देऊन आम्हा मेळावा समितीला सहकार्य केले.


      हाच समाज बांधव ज्याने.... अक्षरशः शून्यातून सुरुवात करून ....आज मितीस स्वतःचं एक नाव ,स्वतःच्या व्यवसायाचं एक मोठं विश्व उभं केलं, आणि...आपल्याच समाजाच्या भावी युवक-युवती समोर एक दानशूर व्यक्तिमत्व, प्रेरणादायी व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व म्हणून स्वतःला सिद्ध केलं ......अश्या दानशुर समाज बांधवांसाठी मला....संस्कृत मधील दोन ओळी सुचल्यात..

शतैषु जायते शूर: सहस्त्रेशूच पण्डित:

     वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवती वा न वा अर्थात - शंभरात एखादाच शूर निपजतो, हजारात एखादाच पंडित निपजतो, दहा हजारात एखादाच वक्ता निपजतो, परंतु दातामात्र निपजणे कठीणच. व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक दानशूर, आभाळाएवढे मन असलेल्या आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या आपल्या समाज बांधवांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळेच हा मेळावा खऱ्या अर्थाने एक प्रेरणादायी मेळावा ,दानशूर समाजबांधव असलेला ...एक आदर्श मेळावा म्हणून गौरवला गेला ही आम्हां अ.नगरकरांसाठी अभिमानाची बाब आहे ह्यात काही शंकाच नाही. याच बरोबर हा आदर्श मेळावा आगळावेगळा का बरं आहे हे असे अनेक लोक..... जेव्हा आम्हास विचारतात...... तेव्हा इथे अनेक गोष्टींचा उल्लेख करावा लागतो ज्यामध्ये...... प्रथम ठासून सांगावेसे लागते ते म्हणजे ......हा मेळावा पूर्णपणे....... हो अगदी पूर्णपणे मोफत आहे. ज्या मध्ये फॉर्म भरणे मोफत, सभागृहात प्रवेश मोफत, अगदी चहापान मोफत, जेवण मोफत, बाहेरगावाहून आलेल्या समाजबांधवांसाठी सर्व सुविधायुक्त राहण्याची सोय सुद्धा मोफत आणि विशेष म्हणजे ......जे जे नियोजित वर किंवा वधू व्यासपीठावर येऊन...जेव्हा स्वतःचा परिचय करून देतील तेव्हाच त्यांच्या हाती फोर कलर असलेली छापील वधुवर पुस्तिका (सौभाग्याचा रेशीम धागा) हातात देण्यात येईल आणि तीही मोफत आणि याचाही पेक्षा सर्वात जास्त कौतुकास्पद गोष्ट म्हणजे या वर्षी आम्ही लकी ड्रॉ च्या माध्यमाने जो नियोजित वर किंवा वधू प्रथम बक्षिसाचे मानकरी झाले... त्या दोघांनाही बत्तीस इंची चा रंगीत टीव्ही सुद्धा दिला आणि दुसरे म्हणजे हा मेळावा ज्या सभागृहात झाला तिथेच्.... समन्वय कक्षात पालकांना व्यवस्थित चर्चा करता आल्या, ओळखीपाळखी करता आल्या ......आणि त्याचबरोबर त्यांना वेळोवेळी लागणारी मदत देण्याचा आमचे सर्व मेळावा समितीमधील सर्व पदाधिकारी ......आपल्या पद्धतीने सर्वतोपरी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते .....आणि हे सर्वकाही बाहेरगावचे समाजबांधव अतिशय बारकाईने न्याहाळत होते... आणि कौतुक करत होते..... आणि आमच्या सर्वांचा उत्साह वाढवत होते. आणि हो......एक अतिमहत्वाचं सांगायचं राहिलं... आणि ते म्हणजे......मागील दोन वर्षापासून आम्ही मेळाव्याचा झालेला जमाखर्च आमचे सर्व...... देणगीदार आणि जाहिरातदार... यांच्या घरी घरपोच पाठवला.... ज्यामुळे आम्ही सर्वांच्या..... विश्वासात राहण्याचा प्रामाणिक पणे प्रयत्न केला .....आणि हो....या वर्षी सुद्धा जमाखर्चाचा हिशोब मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी पासूनचसुरु झाला..... आणि लवकरच सर्व समाजबांधवांच्या घरी पोहोचेल..... यात काही शंकाच नाही .मला वाटतं हेच आमच्या मेळाव्याचे वैशिष्ट्य आहे.,जे.... खरंच कौतुकास्पद आहे. थोड इथं मुद्दामहून सांगावसं वाटतयं...हा मेळावा.... आदर्श मेळावा करण्यासाठीच....आमच्या मेळावा समितीच्या प्रत्येक समाज बांधवांची....प्रामाणिक धडपड, तळमळ आणि मेहनत जर.....आपण जाणून घ्यायचा....प्रयत्न केला तर....लक्षात येईल....या मेळाव्यामागची.....प्रचंड मेहनत,कष्ट, आणि अपार निष्ठा कशी जगून दाखवली आमच्या सर्व समाजबांधवांनी....मगच लक्षात येईल. मेळाव्याच्या दिवसापासून .....आपण मागे दोन-तीन महिने वळून पाहिले तर ......लक्षात येते की प्रत्येक समाजबांधवांनी आपले व्यवसाय सांभाळत,नोकरी सांभाळत, उदरनिर्वाहाचे साधन सांभाळत,..... मेळाव्यासाठी चे....पडेल ते,मिळेल ते, जमेल ते,सांगेल ते,दिसेल ते...... लक्षात आले ते.... काम अतिशय आनंदाने केले,प्रसंगी.....स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता खाण्यापिण्याच्या वेळा न पाहता......जे मिळेल ते खाऊन..... पाणी पिऊन सकाळ, दुपार, सायंकाळी, रात्री,अगदी..... पहाटेपर्यंत मेळाव्याचे काम अतिशय निष्ठेने करण्याचा ......प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि याचे फळ म्हणजे.... जमलेल्या सर्व समाज बांधवांच्या चेहऱ्यावर चे स्मित हास्य ......आणि त्यांनी दिली आमच्या पाठीवरची कौतुकाची थाप..... आणि मुख्य म्हणजे.....आम्हां सर्वांना मिळालेला त्यांचा....भरभरून आशीर्वाद......हेच या मेळाव्याचं वैशिष्ट्यं म्हटलं तरी काही वावगे ठरणार नाही.

     मेळावा १ डिसेंबरला झाला असला तरीही..... बाहेर गावातील आपले समाज बांधव काही कारणास्तव दानशूर समाज बांधव या मेळाव्याला हजर राहू शकले नाही ......म्हणून त्यांच्या गावात जाऊन..... त्यांच्या घरी जाऊन त्यांचा यथोचित सत्कार करून ,संताजी पगडी देऊन सन्मान करणारा हा आमचा हा महा सपना एकमेव असा मिळावा आदर्श मेळावाआहे असे सांगिताना आम्हाला काकणभर जास्त आनंद होत आहे..... बरोबर ना?
जाता....जाता .....एक गोष्ट मात्र....नक्की ....मागील दोन वर्षांपूर्वीचा आढावा पाहिला तर ....हा आदर्श मेळावा... या वर्षी सुद्धा....आदर्श मेळावा झाला .......आणि इथून पुढेही होणार आहे.... मेळावा समितीमधील प्रत्येक समाज बांधवांची प्रामाणिक धडपड आणि मेहनत.... इथून पुढेही असणार आहे..... दिसणार आहे..... मागील दोन वर्षी या मेळाव्याच्या माध्यमाने अनेक पालकांनी आपल्या आवश्यकतेनुसार ,योग्य ती तडजोड करून ,सुवर्णमध्य साधून.... जमलेच तर सुवर्णमध्य काढून ....प्रत्येकाचा मानपान ठेवून..... दोन्ही घराण्याकडे ऋणानुबंध कसं जुळवून आणता येईल याचा पुरेपूर... सकारात्मक विचार करून "नाते दोन मनांचे जोडतो धागे आयुष्याचे".... असे म्हणून..विवाह योग जुळवून आणले. ह्या वर्षी सुद्धा.....आम्ही सर्व जण अशी आशा करतो की.... उपस्थित पालकांमधून आपल्या नियोजित वधु-वरांसाठी "सौभाग्याचा रेशीम धागा" बांधता येईल....खऱ्या अर्थाने ... विवाह सोहळ्याचा सुवर्णयोग कसा जुळवून आणता येईल...... याचा विचार नक्की करत असतील.
कदाचित त्यामुळेच आम्हाला या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागला असे ना..... मग तो भलेही मानसिक असो, आर्थिक असो,आम्ही... कधीही एकटे...समजले नाही कारण आमच्या बरोबर होता आमच्या अगणित समाजबांधवांच्या दुआ आणि आमच्या संताजी महाराजांचा आशीर्वाद थोडक्यात सांगायचं तर...

मुश्किलें जरुर है... मगर ठहरा नही हूं मै मुश्किलों से जरा कह दो...
अभी पहूंचा नहीं हूं मै साथ चलता है मेरे...
दुआओं का काफिला किस्मत से जरा कह दो... अभी तनहा नही हुं मै

दिनांक 14-01-2020 19:28:30
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in