पनवेल : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग व जय संताजी तेली समाज मंडळ, पनवेल यांच्या वतीने टपाल नाका येथील श्री शनैश्वर मंदिर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ५१ जणांनी रक्तदान केले. या सर्वांना प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे अध्यक्ष रामदास तडस, कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, महासचिव भूषण कर्डिले, कोषाध्यक्ष गजुनाना शेलार यांच्या आदेशानुसार हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी संतश्रेष्ठ शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग अध्यक्ष डॉ. सतीश भालचंद्र वैरागी यांच्या हस्ते श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश धोत्रे कार्याध्यक्ष, तुकाराम किर्वे, सुनील खळदे, मनोज खळदे, प्रिया डिंगोरकर, जयश्री वैरागी, प्रशांत शेडगे, अनिल खोंड, श्रद्धा खोंड, गजानन शेलार, रवी जगनाडे, दीपू जगनाडे या पदाधिकारी व इतर समाज बांधवांच्या सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला राजेंद्र रहाटे, कुणाल महाडिक, विठ्ठल सकपाळ, गणेश महाडिक, रवींद्र निगडे, मंगेश रसाळ, संतोष रहाटे व इतर समाज बांधवांनी उपस्थिती लावली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade