धाराशिव - धाराशिव शहरातील सांजावेस गल्लीत वीरशैव लिंगायत जंगम मठात आज राष्ट्रसंत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.याप्रसंगी संताजी जगनाडे महाराज यांच्या अभंगांचे वाचन करून सर्वांनी यांचा अभ्यास व विचाराचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे सर्वांनुमते ठरले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर,बारा बलुतेदार महाराष्ट्र राज्याचे राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,महाराष्ट्र नाभिक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने,तेली समाज संघटनेचे कोषाध्यक्ष महादेव मेंगले,अँड खंडेराव चौरे,वडार समाजाचे नेते पिराजी मामा मंजुळे,भावसार समाजाचे जिल्हाध्यक्ष वैभव हंचाटे,गोंधळी समाजाचे जिल्हाध्यक्ष सतिश लोंढे,लिंगायत समाजाचे जिल्हाध्यक्ष शिवानंद कथले,तेली समाज संघटनेचे मार्गदर्शक लक्ष्मण निर्मळे, मंगेश जवाद,प्राचार्य डॉ अनिल देशमाने,तेली समाज संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष शशिकांत बेगमपुरे,तेली समाज संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख कपिल नवगिरे,मुन्ना सुरवसे,वैजिनाथ गुळवे,प्रविण घोडके,नागेश निर्मळे,यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade