पोंभूर्णा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 ते दुपारी 2 वाजता मोफत रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले, तर संध्याकाळी विशेष रॅली काढण्यात आली होती. रॅली ला भरपूर समाजबांधवांनी उपस्थिती दर्शविली.रॅली नंतर प्रबोधन कार्यक्रमाला उपस्थित शहर नगराध्यक्ष सौ. सुलभा ताई पिपरे, वैद्यकीय व्यावसायिक डॉ.नैताम ,तेली समाज तालुकाध्यक्ष श्री गुरू भाऊ पिपरे, नगरसेवक नंदू भाऊ बुरांडे, जेष्ठ नागरिक श्री अशोकजी सातपुते,माजी नगरसेवक मोहन चलाख,तेली समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री ईश्वर जी नैताम, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते .

मानवतेची शिकवण देणारे संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांचे जयंती साजरी करत असताना त्यांचे विचार आत्मसात करून समाज सुधारणेला हातभार लावावा असे विचार डॉ नैताम यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले , श्री अशोक जी सातपुते यांनी सामाजिक प्रबोधना द्वारे तेली समाज विकसित व्हावा असे मार्गदर्शन केले तर सुलभा ताई पिपरे यांनी संताजी जगनाडे महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला.या कार्य क्रमा चे संचालन श्री विनोद धोडरे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री गुरूदास पिपरे यांनी मानले. या कार्यक्रमा च्या यशस्वी होण्याकरिता श्री राकेश देवताले, जगन जी कोहळे, दिपक कूनघाटकर,तसेच शहरातील युवा कार्यकर्ते व नागरिकांनी भरपूर परिश्रम घेतले.


संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade